Posts

Showing posts with the label government yojan

National Food Security Mission|राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस

Image
योजनेबद्दल विभागाचे नाव कृषी विभाग राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान  सारांश सन 2007-08 पासून राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेऊन 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सदर अभियानाअंतर्गत भात, गहू, कडधान्य, व भरडधान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे. सन २०१४-१५ पासून बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सन २०१८-१९ व २०१९-२० ही वर्षे केंद्र शासनाने पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) वर्षे म्हणून जाहीर केली आहेत. त्यास अनुसरून सन २०१८-१९ पासून केंद्र शासनाने पूर्वीच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - भरडधान्य अभियानात बदल करून दोन स्वतंत्र अभियाने राबविण्याचे धोरण अंगिकारले आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - भरडधान्य अंतर्गत मका पिक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) अंतर्गत ज्वारी, बाजरी व रागी या पिकांसाठी स्वतंत्र अभियाने सुरु केली आहेत. या दोन अभियानांसाठी अभियाननिहाय नव्यानेच स्वतंत्र नियतव्यय निर्धारि...

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान|Agricultural Mechanization Sub-Campaign

Image
  योजनेबद्दल विभागाचे नाव कृषी विभाग सारांश कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे. उद्देश : जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. कृषी यांत्रिकीकरणाचे धोरण : कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे कृषी यांत्रिकीकरणाचे अनुदान या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल: १) ट्रॅक्टर २) पॉवर टिलर ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे ४) बैल चलित यंत्र/अवजारे ५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे ६) प्रक्रिया संच ७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे १०) स्वयं चलित यंत्रे भाडे तत्वावरील सुविधा केंद्र: १) कृषि अवजारे बँकेची स्थापना २) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राच...