Green Hydrogen Policy : ऊर्जा स्वावलंबनाचा ‘हरित’ मार्ग
Green Hydrogen Subsidy : जगाचे भविष्यातील खरे इंधन म्हणून हरित हायड्रोजनचा केवळ उल्लेख होत नाही, तर या इंधनाचे भवितव्य प्रचंड ‘ब्राइट’ आहे. ऊर्जा स्वावलंबनाचा ‘हरित’ मार्ग Green Hydrogen Policy : भारताने २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याबरोबर २०४७ पर्यंत ऊर्जेमध्ये आत्मनिर्भर बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करायची असतील, तर आपल्याला अक्षय ऊर्जास्रोतांवर भर द्यावा लागणार आहे. हरित ऊर्जादेखील सूर्यप्रकाश, हवा, पाणी यांपासून निर्माण केली जाते. पाण्याचे इलेक्ट्रोलायसिस करून त्यापासून ऊर्जानिर्मिती केली जाते, त्याला हरित हायड्रोजन म्हणतात. Green Hydrogen Policy कार्बन उत्सर्जन कमी करून ऊर्जेमध्ये स्वावलंबनासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन’ अगोदरच हाती घेतले आहे. या मिशनअंतर्गत २०२३ पर्यंत देशात पाच दशलक्ष टन हरित हायड्रोजन दरवर्षी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनलाच पूरक म्हणून नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने नुकतेच ‘हरित हायड्रोजन धोरण’ जाहीर केले आहे. या ...