झिरो बजेटपासून सुरू केली शेती आता महिन्याला होतेय लाखोंची कमाई


 मेरठ | अनेक इंजिनिअर तरुण त्यांच्या क्षेत्रात नोकऱ्या नसल्याने दुसऱ्या क्षेत्रात वळताना आपल्याला दिसून येत आहे. तर अनेक तरुण शेती करण्याला प्राधान्य देत आहे. मात्र तुम्ही एका इंजिनिअरला नोकरी असताना ती सोडून शेती करताना पाहिले आहे का? नक्कीच नसेल पाहिले.

असाच एक तरुण आहे ज्याने इंजिनिअरची नोकरी सोडून शेती करण्यात सुरुवात केली आहे. हा तरुण मेरठ मध्ये राहत असून बी टेकची डिग्री घेतली आहे मात्र तरीही त्याने प्राकृतिक शेती करण्याचे ठरवले. कमल प्रताप तोमर असे या तरुणाचे नाव आहे.

कमलने ३ एकरमध्ये झिरो बजेट शेती केली त्यानंतर आता तो ६ एकरमध्ये शेती करतोय. २०१२ मध्ये कमलने बिटेक केल्यानंतर त्याने नोकरीही केली. त्यानंतर त्याने शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला कमलने जैविक शेती करण्याचे ठरवले पण त्यात त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर कमलने गव्हाची शेती करण्याचा निर्णय घेतला. या शेतीतून त्याला ४० हजार रुपयांचा नफा झाला.

त्यानंतर त्याने एक सोबत अनेक पिके लावण्याचे ठरवले. यात कमलने हरभरा, उडीद, मुंग, बाजरी, यांसारखी पिके घेतली. यात कमलला जवळपास १ लाख २५ हजार रुपयांचा नफा झाला

कमल हा झिरो बजेट फार्मिंगला प्राधान्य देत आहे. त्याने शेतात खत तयार करण्यासाठी एक गाय विकत घेतली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार गायीच्या शेणापासून इतके खत तयार होते की वर्षभर बाजारात खत आणायला जाण्याची गरज पडत नाही.

गायीच्या १ ग्राम शेणात ३०० ते ५०० कोटी मायक्रो बॅक्टेरिया असतात. हे शेती करण्यासाठी खुप गरजेचे असतात. गायीच्या गोमूत्र आणि शेणापासून खत तयार करता येते. सोबतच या पासून शेतीसाठी कीटकनाशक ही बनवता येते.

कमल हा घरीच खते बनवण्याचे काम करतो. त्यासाठी जीवामृत हा सुभाष पालेकर यांचा सोपा आणि कमी खर्चिक उपाय आहे. जीवामृत बनवण्यासाठी १० किलो गायीचे शेण, १० लिटर गोमूत्र यांची गरज असते. त्यानंतर शेणात आणि गोमूत्रात २ किलो गूळ, २ किलो बेसन, वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडा खालची १०० ग्राम माती हे सर्व २०० लिटर पाण्याच्या ड्रममध्ये ठेवले जाते.

ड्रमवर झाकण लावून ठेवावे. दोन दिवस ते तसेच ठेवावे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण हलवावे. हे जीवामृत शेतीसाठी आठवडाभर पुरेल एवढे तयार होते.

तुम्ही शेणाचा आणि गोमूत्राचा वापर कीट पतंग थांबवण्यासाठीही करू शकतात. ५ किलो शेणात ५०० ग्राम तूप टाकावे. त्यानंतर हे मिश्रण एका मटक्यात टाकून वरून एका कपड्याने झाकून ठेवावे. हे मिश्रण ४ दिवस झाकून सकाळ संध्याकाळ असे नीट हलवून मिसळावे.

जेव्हा यातून तुपाचा वास येण्यास सुरुवात होईल. तेव्हा त्यात ३ लिटर गोमूत्र, दोन लिटर गायीचे दूध, दोन लिटर दही, तीन लिटर गुळाचे पाणी, १२ केळी, मिसळावे, हे मिश्रण १५ दिवसांपर्यंत रोज १० मिनिटांपर्यंत हलवावे. या मिश्रणात ५० लिटर पाणी मिसळावे, हे मिश्रण एक एकर शेतीसाठी पुरेसे आहे. हे मिश्रण सहा महिन्यापर्यंत टिकून राहू शकते. अशा पद्धतीने तुम्ही झिरो बजेट शेती करून लाखो रुपयांची कमाई करू शकतात.

Comments

Popular posts from this blog

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023: ऑनलाईन अर्ज आणि संपूर्ण माहिती, Falbag Lagwad Yojana 2023

जॉब कार्ड म्हणजे काय ? जॉब कार्ड कसे बनवायचे ? जॉब कार्ड चे फायदे ? सर्व माहिती पहा मराठी मध्ये | Job Card Mhanje Kay ?

Mashroom Farming Success Story : नोकरी सोडून केली मशरुमची शेती