शेतकरी महारुद्र चव्हाण यांची अँपल बोर शेती

 सोलापूर सारख्या दुष्काळी भागात शेतकऱ्यांना नेहमीच अनेक अडचणींना सामना करावा लागतो, कमी पाण्यात होणार फळ म्हणून बहुतांश शेतकरी  डाळिंबाच पीक घेतात, तसेच  बोरं हे देखील एक अस फळ आहे जे शेतकऱ्यांना परवडत. बोराच्या अनेक जाती आहेत, त्यातलीच एक म्हणजे अँपल बोर.

सोलापूर जिल्हातील एक शेतकरी महारुद्र चव्हाण यांनी या अँपल बोराची लागवड करून थोडथोडक नाही तर तब्बल एक्कविस लाखाचं उत्पन मिळवलं. महारुद्र चव्हाण यांची सोलापूर जिल्ह्यातील, माढा तालुक्यातील, केवड या गावी पंचवीस एकर शेती आहे, यातील सात एकर मध्ये याआधी द्राक्षाचं पीक ते घेत होते, परंतु ती झाड मोडल्यानंतर आता कमी पाण्यामध्ये कोणतं पीक घेता येईल याचा ते विचार करू लागले.

त्यासाठी त्यांनी शेततळे पण घेतले व अँपल बोराची पाच एकरात बारा बाय पंधरा या अंतरावर लागवड केली, या झाडांना त्यांनी संपूर्ण पणे सेंद्रिय खते वापरली. त्यासाठी त्यांनी शेण, गोमूत्र, तूप आणि ताक यांच्या मिश्रणाची स्लरी चा वापर केला, तसेच झाडांवर कीड रोग नियंत्रणासाठी म्हणून त्यांनी गोमूत्र फवारले यामुळे चव्हाण यांना फळांच विषमुक्त उत्पादन मिळालं आणि जवळपास सात महिन्यामध्ये  त्यांना एक्कविस लाखाच उत्पन्न मिळाल.

पाच एकरात त्यांनी 1600 झाडांची लागवड केली. परंतु भरघोस उत्पन घेण्यासाठी पाण्याची कमतरता भासू लागली, म्हणून त्यांनी शेतात एकोणीस ठिकाणी बोर केल्या व त्याच पाणी अडीच कोटी लिटर पाण्याची क्षमता असलेल्या शेत तळ्यात सोडलं, व ठिबक द्वारे ते झाडांना दिलं. आतापर्यंत त्यांना साठ टन फळांचं उत्पन्न मिळालं. त्यांना ३६ रुपये किलोचा भाव मिळाला.

या सर्वात त्यांना जवळपास दीड लाखांचा खर्च आला. अँपल बोर व्यतिरिक्त अडीच एकरात वि एन आर पेरू आणि गोल्डन सीताफळाची देखील त्यांनी लागवड केली. द्राक्षाची बाग मोडून बोराची बाग लावताना त्यांना वेड्यात काढणारे आता त्यांची बाग बघायला येत आहेत. यापुढे असंच दर्जेदार उत्पादन घेत शंभर रुपये प्रतिकिलो भाव मिळवण्याचं त्यांचं ध्येय आहे.

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी स्वतः च्या व्हिजन वर विश्वास असणं महत्वाचं असतं ह्याच विश्वासाला मेहनतीची जोड देत चव्हाण यांनी यश मिळवून दाखवलं. त्यांच्याप्रमाणेच गोंदिया जिल्ह्यातील एक तरुणानं देखील हे धाडस करून दाखवलं, गोंदिया जिल्हा हा धानाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो.

मात्र यातून फारस उत्पन्न मिळत नसल्याने तरुण शेतकरी प्रवीण कातगते यांनी अडीच एकरात अँपल बोराची लागवड केली आणि पहिल्याच वर्षी त्यांनी लाखोंचं उत्पादन मिळवलं. दोन वर्षांपूर्वी प्रवीण यांनी पश्चिम बंगाल वरून अँपल बोराची रोपं आणली होती, त्यासाठी त्यांना प्रतिरोप दीडशे रुपये खर्च आला.

चौदा बाय दहा या अंतराप्रमाणे अडीच एकरात साडेसातशे झाडांची लागवड केली. लागवडीसाठी मल्चिंग पेपर, रोपं, मजुरी यांचा मिळून त्यानां पाच लाख खर्च आला, परंतु पहिल्याच वर्षी त्यांना भरपूर उत्पादन मिळालं. प्रति झाड पंचावन्न ते साठ किलो अस पीक आलं. पहिल्या वर्षी त्यांनी दहा किलोच्या बॉक्स मध्ये पॅक करून विक्री केली, त्यामध्ये त्यांना 25-30 रुपये प्रति किलो दर मिळाला. यात त्यांना सहा लाख रुपयांच उत्पन्न मिळालं.


Comments

Popular posts from this blog

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023: ऑनलाईन अर्ज आणि संपूर्ण माहिती, Falbag Lagwad Yojana 2023

नवीन घरकुल यादी कशी पाहायची | Gharkul Yadi Kashi Pahayachi - PMAY Gharkul Yojana Navin List

जॉब कार्ड म्हणजे काय ? जॉब कार्ड कसे बनवायचे ? जॉब कार्ड चे फायदे ? सर्व माहिती पहा मराठी मध्ये | Job Card Mhanje Kay ?