Mashroom Farming Success Story : नोकरी सोडून केली मशरुमची शेती

 

Mashroom Farming Success Story : नोकरी सोडून केली मशरुमची शेती

Mashroom Farming Success Story


उत्तराखंड येथील कुलदिप उप-उत्पादनांपासून करतोय लाखोंची कमाई

नवी दिल्ली : Mashroom Farming Success Story… घरी शेती असली तरी चांगले शिक्षण घेवून सरकारी नोकरी करावी. नाही सरकारी नोकरी मिळाली तर एखाद्या कॉपोरेट कंपनीत चांगल्या पगारावर काम करावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. कोणालाही नोकरी सोडून शेती करावी, असे वाटणार नाही. परंतु, उत्तराखंड राज्यातील भैंसकोटी येथील एका तरुणाने नोकरी सोडून शेतीची कास धरली. हा तरुण मशरुमची शेती करत असून त्यापासून तो बिस्कीट, चवनप्राश यासारखी उत्पादने बनवून लाखोंची कमाई करत आहे.

Mashroom Farming Success Story

टिहरी गढवाल (उत्तराखंड) येथील भैंसकोटी या छोट्याशा गावात कुलदीप बिष्ट हा राहत असून त्याचे वडील शिक्षक आहेत. कुलदीप ने शिकावे आणि नोकरी करावी अशी त्याच्या वडीलांची इच्छा होती आणि याच विचाराने त्यांनी कुलदीप याला एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी गाजियाबाद येथे पाठविले. शिक्षण पुर्ण केल्यानंतर कुलदिपने एका मोठ्या बँकेत नोकरी स्विकारली. मात्र, शेतीविषयी आवड असल्याने त्याचे मन नोकरीत रमत नव्हते. शेती क्षेत्रात काही तरी नवीन केले पाहिजे असे त्याला नेहमी वाटायचे.

आजोबांकडून मिळाली प्रेरणा

कुलदिप याचे आजोबा देखील सिंचन विभागा नोकरीला होते. नोकरी करीत असतांना ते वडीलोपर्जित शेती देखील सांभाळत होते. त्यांनी त्यांच्या शेतजमिनीवर 250 ते 300 फळझाडांची लागवड केलेली होती. या फळझाडांची काळजी घेण्यामध्ये कुलदिप देखील त्याच्या आजोबांना मदत करत असे. त्यातूनच त्याला शेतीची आवडनिर्माण झाली आणि त्याने शेती क्षेत्रात नवीन काही तरी करण्याचा निर्णय घेतला.

बचत खर्चुन केली सुरुवात

देहराडून आणि त्याच्या आसपासचा परिसर मशरुमच्या शेतीसाठी ओळखला जातो. परंतु 2017 पर्यंत कुलदिप याच्या गावातील शेतकरी मशरुमची शेती करीत नव्हते. त्यामुळे त्याच्या डोक्यात मशरुमची शेती करण्याची कल्पना सुचली आणि त्याने बचत केलेली रक्कम खर्च करुन शेती करण्याच्या कामाला सुरुवात केली. या विषयी बोलतांना कुलदिप सांगतो की, माझ्या या कामात माझ्या मित्रांनी मला मदत केली. आमच्या बचतीचे चाळीस हजार रुपये खर्च करुन या कामाला सुरुवात केली. भाड्याने खोली घेवून या कामाला आम्ही सुरुवात केली. त्यावेळी मी दिवसा नोकरी आणि रात्री शेती करत असल्याचे तो सांगतो.

Mashroom Farming Success Story

थोडक्यात महत्वाचे

भैंसकोटी या छोट्याशा गावातील रहिवासी
गाजियाबाद येथून घेतले एमबीएचे शिक्षण
दिवसा नोकरी आणि रात्री शेती करत साधला समतोल
बँकेची नोकरी सोडून रमतोय शेतीत
मशरुम आणि मशरुम पासून बिस्कीट, चवनप्राश सारख्या पदार्थांची निर्मिती
लॉकडाऊनमध्ये अनेकांना केले प्रशिक्षित करुन शेतकरी गटांची निर्मिती
आतापर्यंत अडीच हजारावर शेतकर्‍यांना प्रशिक्षण

 

चांगल्या उत्पादनाने वाढला आत्मविश्वास

पहिल्याच प्रयत्नात कुलदिप याता चांगले उत्पादन मिळाल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला. एक वर्षापर्यंत त्याने बँकेत नोकरी करण्याबरोबर शेती देखील केली. काही आठवणींना उजाळा देत कुलदिप सांगतो की, कधी-कधी आम्ही ऑफीसच्या कामातून थोडा वेळ काढून बाजारात मशरुम विक्री करण्यासाठी जात होतो. हळू हळू आम्ही बटन, ऑयस्टर, मिल्की मशरूम बरोबर गेनोडर्मा, शीटाके यासारख्या वाणांच्या मशरुमचे उत्पादन घेणे आणि त्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण घेणे सुरु केले. अखेर, एक वर्षांनंतर कुलदिप व त्याच्या मित्राने नोकरी सोडून जेएमडी फार्म या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली.

उप-उत्पादनांची निर्मिती

शेतीत मिळालेल्या यशानंतर जस-जसे काम वाढू लागले तसे कुलदिपने देहराडून आणि टिहरी या ठिकाणी देखील उत्पादन सुरु केले. ताज्या मशरुम व्यतिरिक्त जे मशरुम वाचत होते, त्या मशरुमपासून त्याने इतर उप-उत्पादने बनवायला सुरुवात केली. सध्या तो मशरुमपासून लोणचे, मुरब्बा, बिस्कीट, कोरड्या पावडरसह अनेक प्रकारचे उत्पादन तयार करीत आहे. आगामी काळात तो मशरुमपासून नुडल्स (सेवया) आणि च्यवनप्राश बनविण्याचा देखील विचार करीत आहे.

शेतकरी गटांची निर्मिती

मशरुमची शेती आणि व्यवसायात मिळालेल्या यशानंतर कुलदिप त्याच्या उत्पादनांना फनगु या नावाने विक्री करीत आहे. लॉकडाऊनमुळे काम कमी झाले होते तेव्हा कुलदिप याने गावातील काही महिलांना एकत्र करुन प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. कोणतेही शुल्क न घेता त्याने प्रशिक्षण दिले. आतापर्यंत त्याने अडीच हजारांवर शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. या प्रशिक्षणाची फलश्रुती म्हणून गावात मशरुम उत्पादक शेतकर्‍यांचा एक गट तयार झाला आहे. कुलदिप सध्या या शेतकर्‍यांकडून मशरुम खरेदी करुन त्यापासून उप-उत्पादने बनवित आहेत.

तरुणांसाठी मोठी संधी

मशरुम शेतीविषयी बोलतांना कुलदिप सांगतो की, मनात काही तरी नवीन करण्याची जिद्द असली तर काहीही करता येणे शक्य आहे. शेती क्षेत्र हे अफाट असून त्यामध्ये नवनवीन करण्यासारखे खुप आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन अत्यंत कमी जागेत मशरुम सारखी शेती करता येवू शकते. आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता शेती क्षेत्राकडे वळले पाहिजे. नोकरी केल्याने तुमचे एकाचेच पोट भरेल. मात्र शेती केल्याने तुम्ही अनेकांचे पोट भरू शकता.

स्त्रोत - Agroworld





Comments

Popular posts from this blog

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023: ऑनलाईन अर्ज आणि संपूर्ण माहिती, Falbag Lagwad Yojana 2023

Mini Tractor Anudan Yojana Maharashtra |मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू, 90% अनुदान

50 thousand net profit from vegetable dehydration