PH म्हणजे 🧪काय :-❓

 *PH म्हणजे 🧪काय :-❓*

*फवारणीच्या 💦पाण्याचा सामू (pH)🔰 किती असावा.. 

                        

PH हा शेतीसाठी व आपल्या दैनदिन जीवनासाठी खुप महत्वाचा आहे. कारण PH मुळे हे समजते की, रसायन हे अॅसिडीक आहे किंवा नॉन अॅसिडीक आहे. आपल्याला अॅसिडीटी झाली होती तेव्हा आपली परिस्थिती काय झाली होती हे आपल्यालाच माहिती. पण याचा अर्थ असा नव्हे की, नॉन अॅसिड चांगले आहे. कारण सजीवांच्या जीवनासाठी ठराविक स्तरापर्यंत अॅसिड हि महत्वाचे आहे. म्हणजेच आपल्याला हे समजले पाहिजे की, *अॅसिड व नॉन अॅसिड कसे ओळखायचे व हे मोजायचे मापक म्हणजे* *PH* .............

      

 *PH =* 

Potential of Hydrogen,

 ( संभाव्य हायड्रोजन.....)


 *हायड्रोजन :-* 

 हे रसायन शास्त्रामध्ये Positive व Negative चार्ज मोजण्यासाठी वापरतात.....


 *PH ची व्याख्या* अशी करता येऊ शकते की, “ *PH हे नंबरांचे प्रमाण आहे. ते दाखवते द्रव्याचे अॅसिड व नॉन अॅसिड गुणधर्म* " हे नंबर 1 ते 14 मध्ये मोजले जातात. जर नंबर 7 पेक्षा कमी आले. तर ते द्रव्य अॅसिड मानले जाते. व जर ते नंबर 7 पेक्षा जास्त आहे तर ते नॉन अॅसिड मानले जाते. व 7 ही संख्या तटस्थ मानली जाते.....

            

नैसर्गिक पाण्याचा *PH :- 7* असतो. व तो तटस्थ मानला जातो. म्हणजेच अॅसिड पण नाही आणि नॉन अॅसिड पण नाही. PH जसे शेतीसाठी महत्वाचे आहे तसेच औषधशास्त्र, खाद्यशास्त्र, शरीरशास्त्र, पर्यावरण शास्त्र, बांधकाम शास्त्र या सर्वासाठी महत्वाचे आहे.....


*संख्यावरून साधारण पणे खालील प्रकार पडतात......*


3.5 :- जहार अॅसिड....

3.5 - 4.4 :- अत्यंत अॅसिडिक....

4.5 - 5.0 :- अतिशय जोरदार अॅसिड...

5.1 - 5.5 :- जोरदार अॅसिड.....

5.6 - 6.0 :- माफक अॅसिड.....

6.1 ते 6.5 :- किंचित अॅसिड.....

6.6 - 7.3 :- तटस्थ (नैसर्गिक)......

7.4 - 7.8 :- किंचित नॉन अॅसिड....

7.9 ते 8.4 :- माफक नॉन अॅसिड.....

8.5 - 9.0 :- जोरदार नॉन अॅसिड.....

9 :- अतिशय जोरदार नॉनअॅसिड...

PH खूप महत्वाचा विषय आहे.... _________________________

            

फवारणीसाठी पाण्याचा *सामू (ph) जास्त महत्वाचं असतो *टीडीएस नाही*.कोणतेही औषध मारताना जवळपास 1% औषध व 99% पाणी च आपण फवारणी करतो अशा वेळी पाणी जर योग्य गुणवत्तेचे नसेल तर फवारणीचा फारसा फायदा होनार नाही.....


 :- फवारणीचा चांगला / अपेक्षित असा रिझल्ट न मिळणे.......

:- फवारणीमधील बुरषीनाषक पावडर ची थाळ (थर) टाकीच्या खालील भागात फवारणी नंतर शिल्लक राहणे.....

:- औषधे एकसारख्या प्रमाणात पाण्यात मिक्स न होणे. इत्यादी लक्षणे हे आपल्या फवारणीच्या पाण्याचा सामू अधिक असण्याचे आहेत.....


 _*फवारणी साठी पाण्याचा सामू हा 5-7 इतपत असावा....*_ 

लिंबाचा रस/ सायट्रिक ऍसिड ने ph कमी करुन आपण सामू कमी करण्याचा प्रयत्न करतो पन आपल्याला ph कमी नाही करायचा 

तर बॅलंस करायचा आहे 

कारण आपण लिंबू सायट्रिक ऍसिड ने ph कधी बॅलंस नाही होत तर तो कमी होतो कमी झालेला ph हा आम्लधारी  मानला जातो तर तो सामू बॅलन्स च  पाहिजे कमी झालेले ph मध्ये तुम्हाला 100% औषधाचा रिझल्ट मिळणार नाही

*सामू बॅलन्स करण्याची औषधे वापरताना फवारणीच्या पाण्यात आधी सामू बॅलन्स  करणारे औषध टाकून पाण्याचा सामू बॅलन्स  करावा व मग नंतर फवारणीचे औषधे टाकावीत. बऱ्याच वेळा शेतकरी ph  बॅलन्सर फवारणीचे औषधे टाकल्यावर टाकतात मग औषधे फुटण्याचे (वाया जाण्याचे) प्रमाण दिसते व मग पूर्ण बॅरेल ओतून द्यावा लागतो.त्यामुळे ph कमी करणारी औषधे वापरताना एवढी गोष्ट नक्की लक्षात ठेवावी...

Comments

Popular posts from this blog

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023: ऑनलाईन अर्ज आणि संपूर्ण माहिती, Falbag Lagwad Yojana 2023

नवीन घरकुल यादी कशी पाहायची | Gharkul Yadi Kashi Pahayachi - PMAY Gharkul Yojana Navin List

जॉब कार्ड म्हणजे काय ? जॉब कार्ड कसे बनवायचे ? जॉब कार्ड चे फायदे ? सर्व माहिती पहा मराठी मध्ये | Job Card Mhanje Kay ?