अमेरीकेतील लाखोंची नोकरी सोडून आली शेती करायला, आज मोठमोठ्या हाॅटेल्सला जातात उत्पादने
धावपळीच्या जीवनात आपल्या सर्वांना चांगल्या जेवणाची गरज असते. त्यामूळे आपण मार्केटमधून ताजे फळ आणि ताज्या भाज्या आणण्याचा प्रयत्न करत असतो. शेंद्रिये शेतीच्या माध्यमातून आपण ताज्या भाज्या आणि फळे खरेदी करू शकतो.
मुंबईपासून काही अंतरावर ‘वृंदावन’ नावाचे एक फार्म आहे. तुम्ही म्हणाल यात काय खास आहे. या फार्ममध्ये जैविक शेती केली जाते. ही शेती करणाऱ्या गायत्री भाटियाने शेतीसाठी त्यांची अमेरिकेतील नौकरी सोडली होती.
दहा वर्षांपूर्वी गायत्री बोस्टनमधील पर्यावरण संरक्षण एंजेन्सीमध्ये काम करत होत्या. त्यांना त्यातून खुप चांगले पैसे मिळत होते. भारतात गायत्रीची दहा एकर शेती होती. त्या शेतीत आंब्याची झाडे होते. त्यासोबतच अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली होती.
त्यानंतर गायत्रीने अमेरिका सोडून भारतात येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. आज त्या शेतात सीताफळ, जांभूळ, अननस, काजू, आंबा, चिकू केळी अशी अनेक प्रकारची झाडे आहेत. त्यासोबतच गायत्री तिथे अनेक प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन देखील घेतात.
गायत्रीने सांगितले की, मी अमेरिकेत काम करत होते. तेव्हा मला जाणीव झाली की, या धावपळीच्या जीवनात आपण सर्वात जास्त नुकसान पर्यावरणाचे करत असतो. त्यामूळे आपल्याला त्यात बदल करायला हवा. या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर मला पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची इच्छा झाली. म्हणून मी पर्यावरणासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि भारतात आले’.
आज गायत्री त्यांच्या शेतात अनेक भाज्या आणि फळांचे उत्पादन घेत आहेत. त्यांची विक्री करतात. त्यासोबतच अनेक प्रकारच्या झाडांचे संरक्षण देखील करतात. आंब्याच्या सीजनमध्ये गायत्रीच्या शेतातून ३००० ते ५००० किलो आंब्याचे उत्पादन होते.
गायत्री म्हणाल्या की, आमच्या शेतात कोणत्याही प्रकारच्या बाहेरील रसायनांचा वापर केला जात नाही. आम्ही स्वतः खत तयार करतो आणि त्याचा वापर पिकांसाठी करतो. पिकांच्या सीजननुसार गायत्री पिकांचे उत्पादन करतात.
शेतातील पिकांच्या रक्षणासाठी गायत्री गौमूत्रा वापर करतात. गायत्रीकडे चार गाय आहेत. त्यांचा त्या शेतात चांगल्या प्रकारे वापर करतात. शेतातील कचऱ्यापासून, झाडांच्या पानांपासून खत निर्मिती केली जाते.
२०१३ मध्ये गायत्रीने विकली मेंबरशिपची सुरुवात केली होती. आज त्यांच्याकडे ५०० मेंबर्स आहेत. फळ, औषधी झाडे, हर्बल टि, भाज्या यांची विक्री केली जाते. त्यासोबतच आवळा कँडी, बेरी जॅम, मँगो जॅम आणि आंब्याची चटणी याची विक्री देखील केली जाते. त्यांची ही सर्व उत्पादने मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये देखील जातात.
याबद्दल बोलताना गायत्री म्हणाल्या की, ‘आम्ही आमच्या जवळच्या भाजी मार्केटमध्ये भाज्या पाठवतो. आम्ही प्रत्येकाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला सामान्य माणसासाठी जेवढं करता येईल तेवढे करतो’
गायत्रीला या शेतीतून महिन्याला लाखो रुपयांचा फायदा होतो. शेतातील कचरा, झाडांची पाने, घरातील कचरा या सर्व गोष्टी एकत्र करून त्यापासुन खत निर्मिती करता येते. तुम्हाला जर पर्यावरणासाठी काही करायचे असेल तर मग शेती करा. शेती हा पर्यावरण जपण्याचा उत्तम मार्ग आहे’.



Comments
Post a Comment