एक शेतकरी, तीन काम! हळदीची शेती, प्रोसेसिंग, मार्केटींग; कमवतोय बक्कळ पैसा
मुंबई | असं म्हणतात की, एखादी गोष्ट जिद्दीने करायची म्हणलं तर या जगात काहीच अशक्य नाहीये. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुण शेतकऱ्याची कहाणी सांगणार आहे. हा तरुण शेतकरी जैविक पद्धतीने ४५ एकरात हळदीचे उत्पादन घेत असून यासोबतच बाकी प्रोसेसिंग करून हळद विकत आहे.
गुजरातच्या सारंगपूर गावात राहणारे ३० वर्षीय भाविक खचर मागील ६ वर्षापासून जैविक पद्धतीने हळदीचे उत्पादन घेत आहे. हळदी उत्पादनाच्या बरोबरच भाविक हळदीवरील प्रोसेसिंग देखील स्वत: च करत आहे. आता पर्यंत भाविक यांनी यामधून लाखोंची कमाई देखील केली आहे.
बीएचे शिक्षण घेतलेल्या भाविककडे ७० एकर शेती आहे. भाविकचे वडील यापूर्वी या शेतीत रासायनिक पद्धतीने कपाशीची शेती करत होते. तसेच भाविक मागच्या काही दिवसांमध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून जैविक शेती बद्दल अभ्यास करत होता. यावेळी भाविकने विचार केला की रासायनिक शेतीत एवढा खर्च करण्यापेक्षा आपण जैविक शेती करू. मात्र भाविकच्या वडिलांचा याला नकार होता. जैविक शेतीतून कमी उत्पादन होईल असं त्यांना वाटत होते.
याबाबत भाविकने सांगितले की, मी माझ्या मतावर ठाम होतो. जे शेतकरी जैविक पद्धतीने शेती करतात त्यांच्याकडे जाणून मी ती पद्धत पाहिली. यानंतर मी जैविक शेती करण्यासाठी माझ्या वडिलांना तयार केले. आणि हळदीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.
हळदीच्या लावगडीबाबत भाविकने सांगितले, हळदीच्या पिकाची अशा शेतात लावगड करा की जेणेकरून त्या शेतात पाणी साठणार नाही. हळद हे एक कंद भाजी प्रकारात असल्याने जास्त पाण्याने ते साडू शकते. तसेच माझा पहिला प्रयत्न चांगला दिसल्याने वडिलांना देखील जैविक शेती पद्धत चांगली वाटली आणि त्यांनी सगळी जमीन माझ्याकडे करायला दिली.
यातून भाविकला इजरायल जाण्याची संधी भेटली. तेथे त्याने प्रोसेसिंग बाबत माहिती जाणून घेतली. शेतकरी स्वत: आपल्या मालाची प्रोसेसिंगकरून विकत असल्याने त्याला अधिक जास्त प्रमाणात नफा होतं असल्याचे भाविकला येथे लक्षात आले.
यानंतर भाविक गावी परतला त्यानंतर त्याने हळदीच्या प्रोसेसिंगला सुरुवात केली. यानंतर त्याने सारंग फार्म या नावाने रजिस्टर करत जैविक सर्टिफिकेट घेतले. सुरुवातीला त्याने एक क्विंटल हळदीची पावडर तयार केली.या विक्रीसाठी त्याने एक लहान दुकान लावले.
याबाबत बोलताना पुढे भाविकने सांगितले, मागील दोन वर्षापासून आम्ही जवळपास ५ क्विंटल हळद तयार केली आहे. यासाठी आम्हाला एका एकरला ५-६ हजार खर्च आला. मात्र आता हळदीची पावडर तयार करून एका एकरात तब्बल ३० – ४० हजारांची कमाई होत असल्याचे त्याने सांगितले आहे.

Comments
Post a Comment