Tomato Farming : पती पत्नीचं प्लॅनिंग सक्सेसफुल, टोमॅटोमुळं अखेर सोन्याचे दिवस,शेतकरी दाम्पत्य बनलं करोडपती

Tomato Farming : पती पत्नीचं प्लॅनिंग सक्सेसफुल, टोमॅटोमुळं अखेर सोन्याचे दिवस,शेतकरी दाम्पत्य बनलं करोडपती


Tomato Farmer Success Story : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात टोमॅटोचे दर वाढलेले आहेत. राज्यातील काही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील गायकर दाम्पत्यानं सव्वा कोटी रुपयांची कमाई केली आहे.

पुणे : राज्यासह देशभरात टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. याचा फायदा राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात टोमॅटो खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने आदेश जारी केले आहेत. उन्हाळी टोमॅटो पिकाचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. आता या दरवाढीचा महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पुण्यातील ईश्वर आणि सोनाली गायकर या शेतकरी दाम्पत्याने ५० लाखांची कमाई केली आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील पाचघर गावातील गायकर दाम्पत्याने 12 एकरांवर पिकवलेल्या टोमॅटोच्या पिकातून अर्धा कोटी रुपयांची कमाई झाली आहे. गेल्या सात वर्षांपासून गायकर टोमॅटोचे पीक घेतात. यावेळी त्यांनी अतिरिक्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन टोमॅटो लागवड केली आणि त्यांच्यासोबत इतर शेतकऱ्यांना देखील चांगला फायदा झाला.

गायकर दाम्पत्याचं नशीब पालटलं

Tomato Farming : पती पत्नीचं प्लॅनिंग सक्सेसफुल, टोमॅटोमुळं अखेर सोन्याचे दिवस,शेतकरी दाम्पत्य बनलं करोडपती


गेली दोन वर्ष टोमॅटो या पिकाला बाजारभाव न मिळाल्याने अनेक टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. मात्र यंदाच्या वर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे सर्व टोमॅटो मार्केट फुल्ल असल्याचे पहायला मिळत आहे. टोमॅॅटो मुळे जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याचे नशीबच पालटले आहे. टोमॅटोमधून त्याला जणू काही लॉटरीच लागली आहे. जुन्नर तालुक्यातील एका शेतकरी दाम्पत्याचं या टोमॅटोने कोट्याधीश बनवले आहे. ईश्वर गायकर आणि सोनाली गायकर असं या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे.

१२ एकरात टोमॅटो शेती

Tomato Farming : पती पत्नीचं प्लॅनिंग सक्सेसफुल, टोमॅटोमुळं अखेर सोन्याचे दिवस,शेतकरी दाम्पत्य बनलं करोडपती

जुन्नर तालुक्यातील पाचघर हे गाव पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. मुबलक प्रमाणात पाणी असल्याने या गावाचा कायापालट झाला आहे. या गावातील तुकाराम भागोजी गायकर हे शेतकरी याच गावात राहणारे. त्यांची परंपरागत शेती आहे. या भागात जवळपास १८ एकर क्षेत्र बागायती आहे. त्यापैकी बारा एकर क्षेत्रावर गायकर यांचा मुलगा ईश्वर गायकर आणि सून सोनाली गायकर शेती बघतात. ते दरवर्षी टोमॅटो पिकाची लागवड करतात. मात्र यंदाच्या वर्षी लावलेल्या टोमॅटोने त्यांना करोडपती बनवले आहे.



Tomato Farming : पती पत्नीचं प्लॅनिंग सक्सेसफुल, टोमॅटोमुळं अखेर सोन्याचे दिवस,शेतकरी दाम्पत्य बनलं करोडपती

एकाच दिवशी १८ लाखांची कमाई


गायकर यांना टोमॅटो विक्रीसाठी पुण्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव मार्केट जवळ आहे. त्यामुळे ते तिकडे टोमॅटो विक्रीसाठी घेऊन जातात. आतापर्यंत त्यांनी महिनाभरात जवळपास १३ हजाराहून अधिक टोमॅटो क्रेट विक्री केले. असून त्यातून त्यांना सव्वा कोटी पेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. त्यांनी एकच दिवशी ९०० क्रेटची विक्री केली त्यातून त्यांनी एकच दिवशी १८लाख रुपये मिळाले आहेत. ते सात वर्षांपासून टोमॅटो लागवड करतात.


हे पण वाचा - शेतक-यांना फार्म हाऊस बांधण्यासाठीची योजना |Farm House Loan Scheme

गायकर दाम्पत्य बनलं करोडपती


गायकर दाम्पत्याला मागच्या महिनाभरात त्यांच्या शेतातील टोमॅटोच्या क्रेटला १००० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. तालुक्यातील टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्यानं महिनाभरात बाजार समितीची जवळपास ८० कोटींहून अधिकची उलाढाल झाली आहे. यंदाच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना टोमॅटोमुळे लॉटरीच लागली आहे. यामुळे १३ ते १४ शेतकरी हे करोडपती आणि अनेक शेतकरी लखपती झाले आहेत. यंदाच्या वर्षी टोमॅटोने शेतकऱ्यांना तारले आहे. यामध्ये गायकर दाम्पत्य देखील करोडपती बनलंय.

तीन ते चार महिन्यांच्या कष्टाचं चीज झालं, १०० महिलांना रोजगार देखील दिला


चांगल्या टोमॅटोला नारायणगाव मार्केट येथे सर्वांत उच्चंकी म्हणाजे २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल झाला आहे.यंदाच्या वर्षी टोमॅटो बागांची मशागत ,तोडणी, क्रेट भरणे, फवारणी यांचे व्यवस्थापन ईश्वर गायकर आणि त्यांची पत्नी सोनाली गायकर यांनी केले होते. त्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन तर चांगले बसलेच पण या टोमॅटोमुळे जवळपास १०० हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांनी तीन ते चार महिन्यांच्या केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे ईश्वर गायकर यांनी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023: ऑनलाईन अर्ज आणि संपूर्ण माहिती, Falbag Lagwad Yojana 2023

Mini Tractor Anudan Yojana Maharashtra |मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू, 90% अनुदान

50 thousand net profit from vegetable dehydration