करतोय शेती; शेती करण्यामागील कारण ऐकून व्हाल थक्क
बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील बरौली गावातील रहिवासी असलेले अभिषेक 2011 पासून शेती करतात. त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला त्याला एक वेगळेच कारण आहे.
अभिषेक यांनी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा त्यांना 11 लाख रुपये पगार होता. त्यांना वडिलोपार्जित 20 एकर जमीन होती. त्यामध्ये ते गवती चहा, हळद, तुळस, या औषधी वनस्पतीची शेती करतात. तसेच अनेक फुलांची देखील शेती करतात. यामधून ते वर्षाकाठी 20 लाख रुपये कमवतात.
अभिषेक सांगतात की जेव्हा ते पुण्यात नोकरी करत होते, तेव्हा अनेक बँकेच्या समोर हे बिहारी सुरक्षारक्षक त्यांना दिसत होते. बिहारमध्ये गावाकडे मोठी जमीन असून देखील याठिकाणी ते नोकरी करतात. त्यामुळे या लोकांचे मन वळविण्यासाठी त्यांनी स्वतः नोकरी सोडली.
काही लोक ठराविक काळातच नोकरी करतात. हे त्यांच्या लक्षात आले, म्हणून लोकांना सांगून काही होणार नाही आपणच सुरुवात केली तर ते लोकांना पटेल यासाठी त्यांनी स्वतः नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी स्वतः शेती केल्यामुळे लोकांना देखील त्यांच्यावर विश्वास बसू लागला. यामुळे अनेक शेतकरी आज त्यांच्या संपर्कात आहेत. सुरुवातीला त्यांनी फुलांची शेती केली. यातून त्यांना पैसे मिळू लागले. यानंतर त्यांनी औषधी वनस्पती लावण्यास सुरूवात केली.
त्याच्या गावामध्ये अनेक प्राणी शेतीचे नुकसान करतात, म्हणून त्यांनी औषधी लावल्या कारण ते ही वनस्पती खाऊ शकत नाहीत. याला पावसाळ्यात जास्त प्रमाणात नुकसान होत नाही, आणि पाणी देखील कमी लागते.
अभिषेक यांच्यामुळे अनेक शेतकरी हे शेती करू लागले आहेत. पूर्ण देशात त्यांनी नेटवर्क तयार केले असून त्यांनी मार्केटिंगसाठी टीम देखील तयार केली आहे. त्यांना उत्कृष्ट शेती यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 मध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
नोकरी सोडल्यानंतर त्यांचा अपघात देखील झाला मात्र हिंमत न हारता त्यांनी यातून बाहेर येऊन शेती केली आणि अनेकांना बिहार सोडून बाहेर न जाण्याचा सल्ला त्यांनी दिला. यामुळे अनेकजण बिहारमध्ये राहून अभिषेक यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करतात.
.


Comments
Post a Comment