मशरुम उत्पादनातून एक महिन्यात 30 हजाराचा नफा '30 thousand profit in one month from mushroom production'
मशरुम उत्पादनातून एक महिन्यात 30 हजाराचा नफा
'30 thousand profit in one month from mushroom production'
| '30 thousand profit in one month from mushroom production' |
तरुण शेतकऱ्याने स्विकारला जोडधंदा.शेतीला शेतीपुरक व्यवसायाची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होते. एका तरुण शेतकऱ्याने भर उन्हाळ्यात राहत्या घरातील 10X10 च्या खोलीत मशरुमचे उत्पादन सुरु केले. केवळ एक महिन्यात त्याला 30 हजार रुपयाचा नफा झाला. त्यामुळे शेतकऱ्यासाठी मशरुम उत्पादन हा नवीन जोडधंदा बनू शकतो याचा राजमार्ग या शेतकऱ्याने दाखवला आहे. या शेतकऱ्याचे नाव आहे श्रीकृष्ण वायरे.
देवळी तालुक्यातील 1350 डोकी असलेल्या नांदोरा या गावातील हा तरुण शेतकरी. घरी 9 एकर शेती असून यावर्षी शेतीतही त्याने भरघोस पीक घेतले. जानेवारी महिन्यात समन्वयित कृषी विकास प्रकल्प (केम) प्रकल्पामार्फत गावातच मशरुम उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेतलेल्या 25 शेतकऱ्यांपैकी श्रीकृष्ण वायरे यांनी दुसऱ्याच दिवशी घरातीलच एका खोलीत 400 बेड तयार केले. समन्वयित कृषी विकास प्रकल्प (केम) मार्फत त्यांना (स्पॉन) बीज पुरवठा करण्यात आला. मशरुमसाठी 27 डिग्री सेल्सियस तापमान राखावे लागते. त्यामुळे मार्च महिन्यात खोलीचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी वायरे यांनी 2 कुलरची व्यवस्था केली. मशरुमला दमट वातावरण आवश्यक असल्यामुळे त्यांनी रात्रंदिवस बेडवर पाणी शिंपडले. केवळ 18 दिवसातच त्यांच्या मेहनतीला फळ आले. मशरुमचा पहिला, दुसरा व तिसऱ्या तोड्यानंतर त्यांना एका महिन्यात 40 किलो सुकलेल्या मशरुमचे उत्पादन मिळाले. '30 thousand profit in one month from mushroom production'
मशरुमला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था समन्वयित कृषी विकास प्रकल्पाने (केम) केली. भारत मशरुम, वर्धा यांनी मशरुम पावडर तयार करण्यासाठी या शेतकऱ्याकडून मशरुम विकत घेण्याचा करार केला. एक किलो मशरुमचे दर 400 रुपये प्रति किलो असून सुकलेल्या मशरुमचे दर 800 रुपये प्रति किलो आहेत. श्रीकृष्ण वायरे यांना एक महिन्यात 30 हजार रुपयांचा नफा झाला यामध्ये केमकडून त्यांना एकूण खर्चाच्या 30 टक्के अनुदान मिळाले. त्याचबरोबर मशरुम बेडमध्ये जीवाणूंचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा पुनर्वापर कंपोस्ट खत म्हणून करता येतो.
अतिशय कमी साधने, कमी कालावधी आणि कमी जागेत लवकर नफा मिळवून देणारे म्हणून मशरुम उत्पादन फायदेशीर ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा जोडधंदा म्हणून केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मशरुम उत्पादनासाठी आवश्यक साधने
- 10 X10 ची एक खोली
- बेड तयार करण्यासाठी प्लास्टिक पिशवी, दोरी, सोयाबीन, गहू किंवा पऱ्हाटीचे कुटार
- स्पॉन (बीज)
उत्तम कालावधी
मशरुम उत्पादनासाठी जुलै ते मार्च हा कालावधी उत्तम आहे. कारण या महिन्यांमध्ये तापमान कमी असल्यामुळे तापमान राखण्यासाठी कुलरची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे हा खर्च वाचतो. यासाठी एकावेळी येणाऱ्या एकूण खर्चाच्या 30 टक्के अनुदान शासनाकडून देण्यात येते.
मशरुमचे फायदे
मशरुमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे आहेत. प्रथिने, अ, क, ड जीवनसत्वे आणि सर्व प्रकारची खनिजांची शरीराची गरज मशरुम पूर्ण करु शकते. काही आदिवासी भागात याचा वापर कुपोषित मुलांसाठी करण्यात येत आहे.
'30 thousand profit in one month from mushroom production'
लेखक - मनीषा सावळे,
जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा.
Comments
Post a Comment