अमेरिकेतली नोकरी सोडून भारतात आला, खरेदी केल्या २० गायी; आज कमावतोय वर्षाला ४४ कोटी , Left his job in America and came to India, bought 20 cows; Today I am earning 44 crores per year
मित्रांनो नेहमी प्रमाणे काहीतरी नवीन आज वाचुया " अमेरिकेतली नोकरी सोडून भारतात आला, खरेदी केल्या २० गायी; आज कमावतोय वर्षाला ४४ कोटी " खाली वाचा संपूर्ण माहिती.'Left his job in America and came to India, bought 20 cows; Today I am earning 44 crores per year'
आयुष्यात पैसाच सर्व काही नसतो. कारण स्वतःचं समाधान देखील खूप महत्वाचं असतं. एखाद्या ठिकाणी तुम्ही करोडो कमावत असाल आणि तुम्हाला तिथं मानसिक समाधान सुख मिळत नसेल तर त्या कमाईला थोडा देखील अर्थ राहत नाही. समाधान मिळवण्यासाठी लोक अनेकदा काहीही करायला तयार असतात.
आज अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्याने आयआयटी खडगपूर मधून इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली. नंतर त्याने मास्तर डिग्री केली, पीएचडी केली. त्यानंतर त्याला मोठ्या पगाराची नोकरी मिळाली, तीही भारतात नाही तर अमेरिकेत. अमेरिकेत मोठ्या हायटेक कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी म्हणल्यावर आयुष्यात अजून काय पाहिजे. पण समाधान नावाची गोष्ट असते ना. ती नव्हती. कारण त्या व्यक्तीला काही तरी वेगळं करून दाखवायचं होतं. जे त्याच्या मनाला समाधान देईल असं.
| 'Left his job in America and came to India, bought 20 cows; Today I am earning 44 crores per year' |
अमेरिकेत नोकरी करताना भारताच्या भूमीची आठवण येत होती. त्यामुळे भारतात येऊन काही तरी स्वतःच वेगळं करायचं या व्यक्तीच्या डोक्यात होतं. या व्यक्तीने अमेरिकेतली आपली मोठ्या पगाराची नोकरी सोडून दिली आणि थेट भारत आपली मायभूमी गाठली. हा व्यक्ती साध्या सुध्या नाही तर इंटेल सारख्या मोठ्या कंपनीत जॉबला होता. ती नोकरी सोडून तो भारतात आला.
या व्यक्तीचं नाव आहे कर्नाटक मधील किशोर इंदुकुरी. किशोर यांनी आपलं राज्य कर्नाटक गाठलं. किशोरला आपल्या गावाकडचं सामान्य जीवन जगायचं होतं. त्याला तो अमेरिकेतला चमचमाट नको होता. गावाकडच्या मातीतलं जीवन तिथं अमेरिकेत जगता येत नसल्याने त्याचा श्वास तिथं गुदमरत होता. अखेर सर्व सोडून त्यानं आपलं घर गाठलं होतं. आता इथं घरी राहून काही तरी वेगळं करण्याचा निर्धार त्याने केला होता.
किशोरला भारतात देखील चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली असती. पण त्यांनी खुप मेहनत घेत डेअरी व्यवसायात पाऊल ठेवले. त्यांनी सुरुवातीला २० गायी खरेदी केल्या. २० गायिंपासून आपल्या डेअरी व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. २०१२ मध्ये त्यांनी हि सुरुवात केली. त्यांनी एवढी मेहनत आपल्या डेअरी व्यवसायात घेतली कि त्यांना यश मिळण्यात काहि शंकाच नव्हती. आज ते वर्षाकाठी ४४ कोटी आपल्या या डेअरी व्यवसायातून कमावतात.
| Left his job in America and came to India, bought 20 cows; Today I am earning 44 crores per year |
भारतात आल्यावर किशोर यांनी अभ्यास केला कि इथं चांगल्या क्वालिटीचे आणि आरोग्यदायी दूध खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे आपण गायी खरेदी करून लोकांना ऑरगॅनिक चांगल्या क्वालिटीचं दूध पोहचावा असं त्यांनी ठरवलं. त्यांनी सुरुवातीला आपल्या कुटुंबातील व्यक्तीसोबत गायीचं दूध स्वतः देखील काढलं. त्यानंतर त्यांनी इन्स्टॉल फ्रिज स्टोर सिस्टीम खरेदी केली. चांगल्या मशिनरीखरेदी करून त्यांनी आपला डेअरी व्यवसाय वाढवला. यामुळे दूध काढण्यापासून ते ग्राहकांना पोहचवण्यापर्यंत दुधाची क्वालिटी खूप चांगली राहत होती.
किशोर इंदुकुरी यांच्या डेअरी चं नाव मुलगा सिद्धार्थ याच्या नावावरून सीड्स फार्म ठेवण्यात आलं आहे. २०१८ मध्ये त्यांच्याकडे ६ हजार ग्राहक होते. ते तेव्हा हैद्राबाद आणि आजूबाजूच्या परिसरात आपलं दूध डिलिव्हरी करायचे. पण सध्या ते १० हजार ग्राहकांना दूध डिलिव्हरी करतात. यामधून त्यांची वार्षिक कमाई जवळपास ४४ कोटींच्या घरात जाते.
किशोर इंदुकुरी यांची हि प्रेरणादायी गोष्ट आपल्या सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. आपण जर एखाद्या क्षेत्रात पूर्ण मन लावून काम केलं तर एक दिवस यश हे नक्कीच मिळतं. अमेरिकेतून नोकरी सोडून देऊन येऊन हा व्यक्ती एवढं काही करू शकतो तर आपण तर शेतकरी पुत्र आहोत. जर प्रामाणिक प्रयत्न करून जर एखादं क्षेत्र निवडलं आणि आपले १०० टक्के दिले तर यश हे मिळतंच. आजकालच्या तरुणांना परदेशात जायचं असतं, पण किशोर यांनी परदेशातून भारतात येत आपल्या मनासारखं काम करून करोडो कमावले आहेत.
https://royalshetkari221019.blogspot.com/
Comments
Post a Comment