Beekeeping : मधमाशांसोबत दोस्ती करायला शिकवणारी ‘सीबीआरटीआय’
Beekeeping : मधमाशांसोबत दोस्ती करायला शिकवणारी ‘सीबीआरटीआय’

Beekeeping Update : परागीभवनाद्वारे पीक उत्पादन वृद्धी, मध, पूरक उत्पादने या अनुषंगाने मधमाशांचे महत्त्व व जाणीव जागृती वाढली आहे. हवामान बदल, रसायनांचा असंतुलित वापर, शत्रूंचे आक्रमण आदी कारणांमुळे मधमाशांची संख्या घटते आहे.
दुसरीकडे मधपेट्यांद्वारे शास्त्रीय मधमाशीपालनाकडे ओढाही वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे (शिवाजीनगर) येथील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (सेंट्रल बी रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट- सीबीआरटीआय) मधमाशीपालन विषयातील कार्याचा वसा ६० वर्षांपासून अखंड चालवत आहे.
एक नोव्हेंबर, १९६२ रोजी स्थापन झालेली ही संस्था खादी आणि ग्रामोद्योग आयोगांतर्गत देशपातळीवर कार्यरत आहे. संस्थेचे उपसंचालक- प्राचार्य ((प्रभारी) श्री. बसवराज म्हणाले की देशात मधमाशीपालन उद्योगाचे क्लस्टर्स तयार करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
चार ‘क्लस्टर्स’ साठी सरकारला दिलेल्या प्रस्तावांपैकी दोन मंजूर झाले आहेत. महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे क्लस्टर कार्यान्वित आहे. संस्थेचे विविध विभाग आहेत. त्यांचा थोडक्यात परामर्श घेऊया.
सुसज्ज ग्रंथालय
-सुसज्ज ग्रंथालय (रिसर्च लायब्ररी) हे या संस्थेचे वैशिष्ट्य.‘इंटरनॅशनल बी रिसर्च असोसिएशन’ या इंग्लंड स्थित संस्थेकडून त्यास मान्यता.
-तब्बल तीनहजार पुस्तके, दोनहजार जर्नल्स, परदेशी १७ ते १८ (ताजी), भारतीय जर्नल्स १० ते १५ (ताजी), संशोधन पत्रिका (रिसर्च पेपर्स), ‘टेक्निकल बुलेटिन्स’, विविध देशांतील मासिके, पाक्षिके अशी सुसज्ज ज्ञानसंपदा.
-पुस्तकाचे लेखक, प्रकाशक, प्रसिध्दी तारीख, पुस्तकाचा गोषवारा, उपलब्धता आदी माहिती देणारी तब्बल दोन लाख ‘रेफरन्स कार्ड्स. त्यांचे क्रमांक व ग्रंथालयातील ‘सॉप्टवेअर’ च्या मदतीने संबंधित पुस्तक शोधणे सोपे जाते.

Comments
Post a Comment