Maharashtra Agricultural Day | कृषी दिनाचा नेमका इतिहास आणि महत्त्व काय आहे?
महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त साजरा केला जातो. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून गणले जाते. कारण भारत अनेक उत्पादनांसाठी या महाराष्ट्रावर अवलंबून आहे. ओलादुष्काळ,कोरडा दुष्काळ, आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होत असून, दरवर्षी शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतो आहे. अशा परिस्थितीत शेती,माती आणि शेतकऱ्यांशी संबंधित सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कृषी दिवस एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतो. (Maharashtra Agricultural Day)
या दिवशी शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. त्यासोबतच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव केला जातो.
कृषी दिनाचा नेमका इतिहास काय आहे ?
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र कृषी दिन किंवा महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. वसंतराव नाईकांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनकही म्हटले जाते.
त्यांच्या जन्मदिवस हा महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो.वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी झाला. १९६३ ते १९७५ या काळात ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते. जेव्हा पासुन वसंत नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासुन त्यांनी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव योगदान दिले असे सांगितले जाते.
महाराष्ट्र कृषी दिनाचे महत्त्व काय आहे ?
महाराष्ट्रात कृषी दिनाला विशेष महत्त्व आहे, कारण वसंतराव नाईक यांनी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बहुमोल सेवा दिली. या दिवशी राज्यभरात अनेक उत्सवांचे आयोजन केले जाते. भारतीय टपाल विभागाने शेत, शेतकरी आणि शेतातील प्राणी या थीमवर अनेक टपाल तिकिटे जारी केली आहेत.
या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राशी संबंधित समस्यांवर बोलण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. कृषी दिन शेतक-यांच्या दुर्दशेबद्दल मदत आणि जागरुकता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकतो.
.jpg)
Comments
Post a Comment