Mini Tractor Anudan Yojana Maharashtra |मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू, 90% अनुदान
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra |मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू, 90% अनुदान
शेतातील विविध कामासाठी शेतकरी मिनी ट्रॅक्टरचा उपयोग करत असतात. सरकारे अश्या शेतकरी बांधवांसाठी मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरु केली आहे. आता गरजू शेतकऱ्यांना शासकीय अनुदानावर मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे. यासाठी शासनाकडून 90 टक्के अनुदान मिळणार आहे. मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागतो ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Who Get Benefit for Mini Tractor Anudan Yojana
हे व्यक्ती असतील मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी पात्र
- सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 23 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे.
- अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वयंसहायता बचत गटांना उत्पादनाचे साधन निर्माण होऊन त्यांचे राहणीमान बदलावे या उद्देशाने ही योजना राबवली जाते.
- केवळ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana| मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना 2023 : मिळवा ९५ टक्के अनुदान
Benefits of this Scheme
योजनेचे लाभाचे स्वरूप
- बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता रु.3.१५ लाखांची आर्थिक मदत.
Terms and Conditions for Mini Tractor Scheme
लाभासाठी अशा आहेत अटी
- बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
- बचत गटातील ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
- सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे दाखले सादर करावेत.
- याआधी यासंबंधीच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने म्हणजेच आवश्यक असणारे साहित्य याच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा रुपये ३.५० लाख इतकी असेल.
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे राहवासी असावेत.
- ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.
Purpose of Mini Tractor Anudan Yojana Maharashtra
मिनी ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र राबविण्याचा उद्देश:-
- या मिनी ट्रॅक्टर योजनेचा उद्देश हा बचत गटांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य लाभावी.
- त्याचप्रमाणे बचत गट ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलीत यंत्र भाड्याने देऊ चांगले उत्पन्न देखील मिळवू शकतात.
- त्याचप्रमाणे याअंतर्गत बचत गटातील सदस्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आली आहे.
vihir-anudan-yojana-maharashtra विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 : मिळवा 4 लाखांचे अनुदान
Required Document List
मिनी ट्रॅक्टर योजना आवश्यक कागदपत्रे
- बँक पासबुक
- बचत गटाचे घटना पत्र
- बचत गटाच्या कार्यकारणी मधील सदस्यांची मूळ यादी
- बचत गटातील सर्व सदस्यांचा जातीचा दाखला
- कुरा कागदावर फोटो सहित बचत गटाची ओळख पत्र
- आधार कार्ड, पॅन कार्ड
Mini Tractor Scheme Application Process
मिनी ट्रॅक्टर योजना अर्ज प्रक्रिया
मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत ज्या बचत गटांना अर्ज करायचा असेल त्यांनी लेखी अर्ज आणि त्या अर्जासोबत आवश्यक ती दर्शवलेली सर्व कागदपत्रे जोडून अर्ज हा समाज कल्याण कार्यालय सहाय्यक आयुक्त परभणी यांच्याकडे जमा करायचा आहे.
How to apply for Mini Tractor Scheme
येथे करावे लागणार अर्ज
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहे व कोणत्या अटी आहेत हे आपण जाणून घेतले.
- या योजनेत ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे. या योजनेच्या लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात भेट द्या.
- या योजनेचे अधिक माहिती हवी असल्यास शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- संपर्क – संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
त्यासाठी येथे क्लिक करा
Comments
Post a Comment