१ रुपयात पीक विमा |1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra 2023

 

फक्त १ रु. पीक विमा योजना


1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra 2023


शेतकऱ्यांनी 31 जुलै 2023 पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे.

Pradhan Mantri Pik Vima Scheme : चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी 31 जुलै 2023 पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. या योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

रीप हंगामातील 14 पिकांसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार

खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा अशा एकूण 14 अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल, मंडळ, क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. 
सन 2023-24 पासून ‘सर्वसमावेशक पिक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार असल्याचे आयुक्त सुनिल चव्हाण म्हणाले.


शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीपूर्वी संबंधित बँक, http://pmfby.gov.in व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा अर्ज करता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज देणे आवश्यक आहे. कर्जदार योजनेत सहभागी होण्यास इच्छूक नसल्यास तसे विहित मुदतीत बँकेला लेखी कळवणे आवश्यक असल्याचे आयुक्त म्हणाले.

रीप हंगामातील 14 पिकांसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार

खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा अशा एकूण 14 अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल, मंडळ, क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. सन 2023-24 पासून ‘सर्वसमावेशक पिक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार असल्याचे आयुक्त सुनिल चव्हाण म्हणाले.


शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीपूर्वी संबंधित बँक,  http://pmfby.gov.in  व आपले सरकार सेवा केंद्र,महा ई सेवा केंद्र  यांच्यामार्फत विमा अर्ज करता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज देणे आवश्यक आहे. कर्जदार योजनेत सहभागी होण्यास इच्छूक नसल्यास तसे विहित मुदतीत बँकेला लेखी कळवणे आवश्यक असल्याचे आयुक्त म्हणाले.


कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी

अहमदनगर, नाशिक, सोलापूर, जळगाव, सातारा जिल्ह्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., परभणी, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि., जालना, गोंदिया व कोल्हापूर जिल्ह्यासाठी युनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि., नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि., औरंगाबाद(छ . संभाजीनगर ), भंडारा, पालघर व रायगड जिल्ह्यासाठी चोलामंडलम एम.एस. जनरल इं.कंपनी लि., वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदूरबार व बीड जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी, हिंगोली,अकोला, धुळे, पुणे व उस्मानाबाद(धाराशिव) जिल्ह्यासाठी एचडीएफसी जनरल इन्शुरन्स.कं.लि., यवतमाळ, अमरावती व गडचिरोली जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि लातूर जिल्ह्यासाठी एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. योजनेतील सहभागासंदर्भात शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास तालुका संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय तसेच तालुका कृषी अधिकारी, नजिकची बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही आयुक्तांनी केलं आहे.


प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे उद्देश

  • शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांची शेतीमध्ये रुची कायम ठेवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • शेताचे नुकसान झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतात त्यापासून बचाव करण्यासाठी या योजनेची सरुवात करण्यात आली आहे.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

FAQ

पीक विम्यासाठी कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे ?

  •  पीकपेरा स्वयं घोषणापत्र
  • सातबारावर उतारा 
  • आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँकेचे पासबूक
  • सामाईक खातेदार असल्यास द्यावयाचे संमतीपत्र
  • मोबाइल नंबर 

या पीक योजनेचा लाभ कधी मिळेल?

१. प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान
२.  हंगाम सुरु असताना प्रतिकूल हवामानामुळे झालेले पिकांचे नुकसान
३. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी उत्पान्नात घट (पावसातील खंड, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, पूर, भूस्खलन)
४. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान
५. नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान

Comments

Popular posts from this blog

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023: ऑनलाईन अर्ज आणि संपूर्ण माहिती, Falbag Lagwad Yojana 2023

Mini Tractor Anudan Yojana Maharashtra |मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू, 90% अनुदान

50 thousand net profit from vegetable dehydration