मोफत पिठाची गिरणी योजना|Free Flour Mill Scheme Maharashtra
मोफत पिठाची गिरणी योजना :
महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे “महिला व बालकल्याण विभागामार्फत” राज्यातील अनुसुचित जाती / जमाती मधील महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये महिलांना पिठाची गिरणीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोफत पिठाची गिरणी योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना विशेष करून ग्रामीण भागात राहण्याऱ्या महिलांसाठी सुरू केली आहे. सध्या या योजनेचा लाभ शहरातील गरजू आणि गरीब महिलांसाठी मिळेल की नाही या गोष्टीची अजून माहिती प्राप्त झालेली नाही.
राज्यामध्ये पिठाची गिरणी योजना मागील काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे. आणि या योजनेअंतर्गत खूप महिलांनी पिठाची गिरणी मोफत मिळवली आहे. ही योजना महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास व आर्थिक परिस्थितीने सक्षम होण्यास मदत करत आहे.
2023 मोफत पिठाची गिरणी योजना काय आहे
महाराष्ट्र राज्यात शासनाकडून मोफत पिठाची गिरणी ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती / जमातीच्या महिलांसाठी पिठाची गिरणी घेण्यासाठी अनुदान दिले जाते. गिरणीच्या कोटेशन/बिलावर ९०% सबसिडी दिली जाते. १०% रक्कम लभार्थ्याला भरावी लागते. या गिरणीचा उपयोग महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केला जातो. ज्यामुळे त्यांना रोजगार मिळून त्यांचे जीवनमान उंचावते. महिलांनी आत्मनिर्भरबनावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.
मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात
या योजनेसाठी अर्ज करताना आपल्याला खलील कागदपत्रांची आवश्यकता आहे :- विहित नमुन्यातील मागणी अर्ज
- आधार कार्ड
- जातीचा दाखला
- रेशनकार्ड
- पीठ गिरणी खरेदीसाठी प्रमाणित रिपोर्ट
- उत्पन्न दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- वीजबिल
- पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो
- मोबाईल क्रमांक
- दारिद्र्य रेषेखालील असल्याचा पुरावा
- व्यवसायासाठी जागेचा “८ अ नमुना”
मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी पात्रता
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अनुसूचित जाती / जमाती या वर्गातील महिला या योजनेसाठी पत्र आहेत.
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांनाच मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेता येईल.
- ज्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी असेल अशा कुटुंबातील महिला मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी पात्र असेल.
- आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र असतील.
- मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी १८ ते ६० वयोगटातील मुली/महिला पात्र असतील.
मोफत पिठाची गिरणी अर्ज कसा करावा
आम्ही आपल्या माहिती साठी सातारा आणि पुणे जिल्ह्याचे मोफत पिठाची गिरणी योजनेचे नमुना अर्ज खाली देत आहोत. आपण ते डाऊनलोड करून पाहू शकता.
- अर्ज मिळाल्यानंतर आपण अर्ज योग्य माहितीसह भरून आणि आवश्यक असलेली कागदपत्रे साक्षांकित करून सोबत जोडून घ्यावी.
- ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांच्या कडून सदर अर्जावरील प्रमाणपत्र भरून घ्यावे.
- त्यानंतर अर्ज आणि सोबत जोडलेले कागदपत्रे घेऊन जिल्हापरिषदे मध्ये जमा करावी.
- अर्जांची पडताळणी झाल्यानंतर आपण पात्र आहात का नाही हे कळवले जाईल.
- आपण जर मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी पात्र असाल तर आपल्या खात्यामध्ये पिठाच्या गिरणीची ९०% रक्कम अनुदान म्हणून जमा केली जाईल.
FAQ : मोफत पिठाची गिरणी योजना संबंधित सतत विचारले जाणारे प्रश्न -
१) मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ कोणत्या महिला वर्गाला मिळणार आहे?
उत्तर - मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ अनुसूचित जाती / जमाती वर्गातील महिलांना मिळणार आहे.
२) मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ पुरुषांना घेता येतो का?
उत्तर - मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ पुरुषांना घेता येत नाही , ही योजना फक्त महिलांसाठी आहे.
३) मोफत पिठाची गिरणी योजनेमध्ये गिरणी चालवण्यासाठी पुरुष काम करू शकतो ?
उत्तर- मोफत पिठाची गिरणी योजनेमध्ये लाभार्थी महिलेची इच्छा असेल तर ती पुरुष कामगार ठेऊ शकते.
उत्तर - मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ अनुसूचित जाती / जमाती वर्गातील महिलांना मिळणार आहे.
२) मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ पुरुषांना घेता येतो का?
उत्तर - मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ पुरुषांना घेता येत नाही , ही योजना फक्त महिलांसाठी आहे.
३) मोफत पिठाची गिरणी योजनेमध्ये गिरणी चालवण्यासाठी पुरुष काम करू शकतो ?
उत्तर- मोफत पिठाची गिरणी योजनेमध्ये लाभार्थी महिलेची इच्छा असेल तर ती पुरुष कामगार ठेऊ शकते.
Comments
Post a Comment