dragon fruit |ड्रॅगन फ्रुट लागवड


dragon fruit ड्रॅगन फ्रुट लागवड

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत-

ड्रैगन फ्रुट लागवड
ड्रैगन फ्रुट (कमलम) हे एक निवडुंग परिवारातिल फळ असून यातील पोषकतत्व व अँटीऑक्सीडंट मुळे या फळास सुपरफ्रुट म्हणुन प्रसिद्धी मिळत आहे. या फळात विविध औषधी गुण तसेच फॉस्फरस व कैल्शीयम यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे टिकून राहतात. या पिकामध्ये किड रोगाचा प्रादुर्भाव नगण्य असुन पिक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत या पिकाची लागवड करण्यास 2021-22 पासून  प्रोत्साहन देण्यात येत आहे.


अर्ज कुठे करावा-
 https://mahadbtmahait.gov.in वर ऑनलाईन अर्ज करावा.

अर्ज करण्यासाठी  लाभार्थी पात्रता काय असावी-
अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.20 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.

अनुदान किती व कधी मिळते-
  • प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के कमाल रु.1.60 लाख इतके अनुदान प्रती हेक्टर मिळते. 
  • आणि हे अनुदान मंडळ कृषी अधिकारी यांनी मोका तपासणी केल्यानंतर 3 टप्प्यात मिळते. पहिल्या वर्षी 60 टक्के, दुसरे वर्षी 20 टक्के आनी तीसरे वर्षी 20 टक्के अनुदान मिळते.
  • अनुदान मिळण्यासाठी दुसरे वर्षी किमान 75 टक्के आणि तीसरे वर्षी 90 टक्के झाडे जिवंत ठेवणे आवश्यक आहे.


अनुदान कोणत्या बाबींसाठी मिळते-
  • खड्डे खोदणे 
  • आधाराकरीता कॉंक्रीट खांब उभारणे 
  • खांबावर प्लेट लावणे
  • रोपे लागवड करणे 
  • ठिबक सिंचन
  • खत व्यवस्थापन व पिकसंरक्षण 


एका लाभार्थीस किती क्षेत्रापर्यंत अर्ज करता येतो-
एका लाभार्थीस किमान 0.20 हेक्टर आणी कमाल 4 हेक्टर पर्यंत  लागवड करता येते आणी अनुदानाचा लाभ घेता येतो.

लागवड कधी करावी व किती अंतरावर करावी-
  • अर्ज केल्यानंतर कृषी सहाय्यक हे स्थळ पाहणी करतात. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी पुर्वसंमती दिल्यानंतर एक महिन्याच्या आत  लागवड काम सुरु करावे. सदर लागवड ही सलग क्षेत्रावर  करणे बंधनकारक आहे. लागवडीसाठी 0.60x 0.60x 0.60 मी आकाराचे खडड़े खोद्णे आवश्यक आहे.
  • लागवडीसाठी सूक्ष्म सिंचन करण बंधनकारक आहे.
  • लागवड ही 4.5x 3 मी. किंवा 3.5x 3 मी. किंवा 3x 3 मी.या अंतरावर करावी.
  • लागवड 4.5 x 3 मी.अंतरावर केल्यास हेक्टरी 2960 रोपे, 3.5x 3 मी.अंतरावर केल्यास हेक्टरी 3808 रोपे आणी 3x 3 मी अंतरावर केल्यास हेक्टरी 4444 रोपे लागतात.

लागवडीसाठी लागणारी रोपे कुठून खरेदी करावीत-
लागवडीसाठी रोपे पुढील प्राथम्यक्रमाने शेतकरी यांनी खरेदी करावीत-
1.कृषी विभाग रोपवाटीका 
2. कृषी विद्यापीठ रोपवाटीका 
3. आयसीएआर संस्था, कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटीका 
4. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायतीच्या रोपवाटीका 
5.सामाजीक वनीकरण किंवा अन्य शासकीय विभागांच्या रोपवाटीका 
वरील ठिकाणी उपलब्ध नसल्यास नोंदणी कृत मान्यता प्राप्त खाजगी रोपवाटीकेतून घ्यावीत.


आवश्यक कागदपत्रे-
7/12 उतारा
सामायिक 7/12 असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
आधार संलग्न राष्ट्रीयी कृत बँक पासबुकच्या प्रथम पानाची झेरॉक्स
आधार कार्ड
जातीचा दाखला(अजा व अज शेतकरी यांचेसाठी)
विहित नमुन्यातील हमी पत्र



Comments

Popular posts from this blog

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023: ऑनलाईन अर्ज आणि संपूर्ण माहिती, Falbag Lagwad Yojana 2023

नवीन घरकुल यादी कशी पाहायची | Gharkul Yadi Kashi Pahayachi - PMAY Gharkul Yojana Navin List

जॉब कार्ड म्हणजे काय ? जॉब कार्ड कसे बनवायचे ? जॉब कार्ड चे फायदे ? सर्व माहिती पहा मराठी मध्ये | Job Card Mhanje Kay ?